-
☰
No image found.
महाराष्ट्र: शाळेच्या मागे भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी
- Photo by :
संक्षेप
महाराष्ट्र: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिव तक्रार म्हाळुंगी या शाळेच्या पाठीमागे बिबट्या भर दिवसा अकरा वाजता आढळण्यात आला बालवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले यांनी तो समक्ष पाहिला
विस्तार
महाराष्ट्र: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिव तक्रार म्हाळुंगी या शाळेच्या पाठीमागे बिबट्या भर दिवसा अकरा वाजता आढळण्यात आला बालवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले यांनी तो समक्ष पाहिला व शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर सर यांना त्यांनी लगेच बोलावून सांगितले मुलांना शाळेच्या बाहेर येवू देवू नका. शाळेच्या पाठीमागे बिबट्या आढळण्यात आलेला आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. तदनंतर काही ग्रामस्थांनाही बोलवण्यात आले व बिबट्या असल्याचे सांगण्यात आले.तदनंतर ग्रामस्थांच्या ग्रुप वरती मेसेज सोडण्यात आला. शाळेच्या पाठीमागे बिबट्या आढळण्यात आलेला आहे. सर्व ग्रामस्थांनी सतर्क रहावे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून वनविभागाला मागणी करण्यात येत आहे. आपण त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा व मुलांना सुरक्षित करावे गावकऱ्यांनाही ह्या बिबट्यांपासून धोका आहे. या अगोदर शेतकऱ्यांच्या शेळी मेंढी वरती या बाबट्याने हल्ला केलेला आहे. त्यामुळे या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही वन अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे.शाळेच्या कंपाउंड ची हाईट अगदी कमी आहे. व ते कंपाऊंड जुने झालेले आहे ते नादुरुस्त असल्यामुळे त्याची दुरुस्ती करून उंची वाढवण्याचे गरज आहे त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे वॉल कंपाऊंड चे काम तातडीने करण्याची गरज असल्यामुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन पाहणी करून त्यावरती ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे।
उत्तर प्रदेश: जिलाधिकारी ने बलुआ बलुई गांव का किया निरीक्षण, विकास कार्यों में तेजी के दिए निर्देश
राजस्थान: सिरोही में 3006 पेड़-पौधों का विशाल वृक्षारोपण, ऊंट संरक्षण पर भी हुई चर्चा
उत्तर प्रदेश: रास्ता पूछने के बहाने किसान से 50 हजार की टप्पेबाजी, लिफ्ट देकर जेब से उड़ाए रुपये
उत्तर प्रदेश: फर्रुखाबाद में भीषण जाम, पांचाल घाट पुल से चौराहे तक वाहनों की लंबी कतार
उत्तर प्रदेश: फर्रुखाबाद में चोरों का आतंक, एक घर से नकदी-जेवरात चोरी; दूसरे में सेंधमारी नाकाम
