-
☰
No image found.
महाराष्ट्र: लोणीकंद येथे भाजपा स्थापना दिवस उत्साहात; जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस आज लोणीकंद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लोणीकंद येथील जिल्हा कार्यालयात पक्षाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. भाजपाची स्थापना
विस्तार
महाराष्ट्र: भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस आज लोणीकंद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लोणीकंद येथील जिल्हा कार्यालयात पक्षाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. भाजपाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली असून भारतीय जनसंघ या पक्षाच्या वैचारिक पायावर उभी राहिलेली भाजपा आज जगातील सर्वात मोठी राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते. ‘राष्ट्रवाद, सुशासन आणि अंत्योदय’ या तत्त्वांवर चालणाऱ्या पक्षाने देशाच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले आहे. प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, मनपा नगरसेवक रामभाऊ दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सातव, माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव शेळके, हवेली नगर रोड मंडल अध्यक्ष विजय जाचक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओंकार कंद, डॉक्टर सेल अध्यक्ष मच्छिंद्र काशीद, तसेच माजी ‘मन की बात’ संयोजक बापूसाहेब काळे यांच्यासह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्वांनी पक्षाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत देशसेवा व समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला।
संघटनात्मक दृष्ट्या भाजपा ही अत्यंत मजबूत, शिस्तबद्ध आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष मानली जाते. बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे करून पक्षाने जनतेशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर दिला आहे. “सबका साथ, सबका विकास” या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा मानला जातो.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या
हरियाणा: 14 अप्रैल को अंबेडकर जयंती व फूले जयंती का किया जा रहा भव्य आयोजन
उत्तर प्रदेश: ‘स्कूल चलो अभियान’ की रैली, बच्चों को शिक्षा से जोड़ने का संदेश
उत्तर प्रदेश: पीएम आवास फ्लैट हुआ जर्जर, निर्माण गुणवत्ता और आवंटन पर उठे सवाल
उत्तर प्रदेश: शिक्षामित्रों और अनुदेशकों का मानदेय बढ़ा, 25 लाख टैबलेट खरीद को मिली मंजूरी
उत्तर प्रदेश: अवैध खनन का बड़ा खेल, प्रशासन पर मिलीभगत के लगे आरोप
मध्य प्रदेश: चाकू हमले के मामले में कार्रवाई न होने पर पीड़ित परिवार ने लगाई न्याय की गुहार
