-
☰
No image found.
महाराष्ट्र: लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मेळाव्यात 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, जागतिक संशोधक डॉ. प्रशांत देशमुख यांचा सन्मान
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: पूर्वी सायबर कॅफेमध्ये बसावं लागत होतं.परंतू आज विद्यार्थ्यांना इंटरनेटमुळे बरीच माहिती त्यांच्या मोबाईलमध्येच उपलब्ध आहे.बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपण आहोत की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.आयुष्य संपवणे हे पर्याय नाहीत,तर अडचणींवर मात
विस्तार
महाराष्ट्र: पूर्वी सायबर कॅफेमध्ये बसावं लागत होतं.परंतू आज विद्यार्थ्यांना इंटरनेटमुळे बरीच माहिती त्यांच्या मोबाईलमध्येच उपलब्ध आहे.बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपण आहोत की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.आयुष्य संपवणे हे पर्याय नाहीत,तर अडचणींवर मात करून आयुष्यात पुढे जायचे असेल तर आभ्यासाला ओझं म्हणून नव्हे तर जबाबदारी समजून स्विकारलं पाहिजे.असे महत्वपूर्ण प्रतिपादन कॅन्सर उपचारपध्दतीच्या संशोधनात २०२५ च्या जागतिक स्तरावरील ५ टक्के शास्त्रज्ञांच्या निवडीतील अग्रेसर शास्त्रज्ञ प्रा.डॉ.प्रशांत कृष्णराव देशमुख (डोंगरगावकर) यांनी केले.यावेळी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शनपर ते बोलत होते.प्राप्त जागतिक बहूमानाबध्दल त्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ५८ व्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अतिथी सन्मान,सभासद आयकार्ड वितरण आणि मार्गदर्शन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा हॉट टीफीन व पाणी बॉटल संच भेट व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विशेष गौरवपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.भेट वस्तू़साठी आर्थिक सहकारृय श्री फाउंडेशनकडून करण्यात आले होते.उपस्थित पालकांनी लोकस्वातंत्र्यच्या या उपक्रमाबाबत आभारासह भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.समारंभाच्या अध्यक्षक्षस्थानी वाशीमचे सेवाव्रती,श्री फाउंडेशनचे अध्यक्ष गिरधारीलालजी सारडा तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा.प्रशांत खोडके,उपाध्यक्ष प्रदिप खाडे, कृष्णराव देशमुख,यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शनासोबतच पत्रकार महासंघाच्या उपक्रमांची माहिती दिली.तर अपयशाला न डगमगता धाडसाने पुढे जाण्याचे आवाहन अध्यक्षिय भाषणातून सारडाजींनी केले. प्राध्यापक, प्राचार्य ते जागतिक संशोधक मुलाच्या या यशस्वी प्रवासातील अनुभवांचे कथन त्यांचे वडील कृष्णराव देशमुख यांनी केले.प्रदिप खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी स्थानिक आकोट फैलातील सैय्यद जमीर,समीर खान,मेहताब शाह व सुवर्णसिंग खटोड,अनिल केळकर,उज्ज्वल वेगीनवार यांचेसह १३ नव्या लोकस्वातंत्र्य सभासदांना आय कार्डांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला सचिव राजेंद्र देशमुख,पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार,सौ.जया भारती-इंगोले,संदिप देशमुख,अॕड राजेश देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,प्रा.डॉ.ममता इंगोले,अॕड.विजयराव देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,विनय टोले,विजय केंदरकर,अजय जहागिरदार,संतोष धरमकर,सतिश देशमुख,पंजाबराव वर,सागर लोडम,मनोहर मोहोड,वसंतराव देशमुख ,सुरेश महल्ले,सुरेश भारती,प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे,मंगेश नरसिंग,धारेराव देशमुख,सुरेश तिडके,अशोककुमार पंड्या,देवीदास घोरळ,एकनाथ पाखरे,राजाभाऊ देशमुख,अविनाश भगत,दिलीप नवले,श्रीकृष्ण माळी,आशिष वानखडे पाटील,सागर लोडम, प्रा.विजयराव काटे,अरविंदराव देशमुख (नागपूर) रामराव देशमुख,बळवंतराव देशमुख (खामगाव)नारायणराव अंधारे,नानासाहेब देशमुख,प्रा.महादेव लूले, संजय कृ.देशमुख,एजाज अहेमद खान, कृ.देशमुख,अभि.विनायक पांडे,विजयराव बाहकर,सौ.किर्ती मिश्रा,सौ.दिपाली बाहेकर,गजानन थोरात,सौ.जया देशमुख,दिपक शिरसाट,फुलचंद वानखडे,गणेश मुळे, रमेश समुद्रे,अमित इंगळे,ना.मा.मोहोड, प्रा.मोहन काळे,जे.टी.वाकोडे,नरेंद्र डंबाळे,गजानन मुऱ्हे,फुलचंद मौर्य अनेक सभासद,पत्रकार विद्यार्थी व बहूसंख्य पालकांसह १५० पेक्षा जास्त उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती-इंगोले यांनी तर आभारप्रदर्शन पुष्पराज गाव़डे यांनी केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली।
उत्तर प्रदेश: वन महोत्सव सप्ताह: तीन ग्राम पंचायतों में ग्रीन चौपाल, ग्रामीणों को बांटे गए पौधे
उत्तर प्रदेश: बंधक जमीन बेचकर बैंक से धोखाधड़ी, 13 किसानों पर FIR; खरीदार भी जांच के दायरे में
मध्य प्रदेश: धोती-साड़ी योजना के तहत लाभार्थियों को वस्त्र वितरित, जनप्रतिनिधियों की रही मौजूदगी
झारखण्ड: धोती-साड़ी योजना के तहत लाभार्थियों को वस्त्र वितरित, जनप्रतिनिधियों की रही मौजूदगी
उत्तर प्रदेश: बंद आरओ, बदहाल शौचालय और मूलभूत सुविधाओं के अभाव से कर्मचारी-ग्रामीण परेशान
